सर्व धर्म मंदिर

सर्वधर्म मंदिर नाशिक मधील एक महत्त्वाची धार्मिक स्थळ आहे. या स्थळाची माहिती खालील प्रमाणे आहे.

स्थान:
सर्वधर्म मंदिर हे पंचवटीतील तपोवन भागात आहे. पंचवटी हा भाग धार्मिक आणि ऐतिहासिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.

धार्मिक महत्त्व:
मंदिरामध्ये श्री गणेश, शंकर-पार्वती, भगवान श्रीराम, भगवान बुद्ध, राधाकृष्ण, विठ्ठल रुक्माई, लक्ष्मीनारायण गुरुनानक, दुर्गामाता या देवातांच्या सुंदर मुर्त्या आहेत. इथे आल्यानंतर प्रत्येक भाविकांचे मन प्रसन्न होऊन जाते.

पर्यटन महत्त्व:
सर्वधर्म मंदिर हे नाशिकमधील एक प्रमुख पर्यटन स्थळ आहे. या ठिकाणी भाविक आणि पर्यटक मोठ्या संख्येने भेट देतात. नाशिकला येणारे पर्यटक पंचवटीतील इतर धार्मिक स्थळांसोबत सर्वधर्म मंदिर चे दर्शन घेतात. हे ठिकाण त्याच्या शांत आणि पवित्र वातावरणामुळे विशेष आकर्षक आहे.

टीप:
तुम्हाला वरील माहिती मध्ये काही करेक्शन करण्याची गरज आहे असे वाटत असल्यास, आम्हाला nashikarinfo@gmail.com या ईमेल वर मेल करा. धन्यवाद.

Leave a Comment